
वाळूजमहानगर, (ता.26) – वाळूज येथील शिवाजीनगर भागात असलेल्या दत्त कॉलनी येथील महादेव मंदिरावर शिवरात्र उत्सवानिमित्त बुधवारी (ता.26) रोजी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
या महादेव मंदिरातील महादेवाच्या पिंडीला सकाळी अभिषेक करून आरती घेण्यात आली. त्यानंतर तोडकर महाराज यांचे प्रवचन होऊन साबुदाणा खिचडी भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आली. दत्त कॉलनी परिसरातील अविनाश कॉलनी, अजिंक्यतारा हाउसिंग सोसायटी, समता कॉलनी, साईकॉलनी, कलानगर, शिवशक्ती कॉलनी येथील भाविकांनी दिवसभर महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. रात्रीच्या वेळी विद्युत रोषणाईने मंदिर आकर्षक दिसत होते.
