March 24, 2026

वाळूजमहानगर, (ता.25) – सध्या बालकांमधील थॅलेसिमियाचे वाढते प्रमाण त्याच बरोबर त्यांना सातत्याने लागणाऱ्या रक्ताचा तुटवडा व अभाव लक्ष्यात घेऊन वाळूज औधोगिक वसाहतीमधील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या इप्का लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीने कंपनीमध्ये घेतलेल्या रक्तदान शिबिरात 102 जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून थॅलेसिमिया रुग्णांसाठी अमूल्य योगदान दिले.

प्रथम इप्का लॅबोरेटरीजचे साईट हेड संजय चौबे, मानव संसाधन विभाग प्रमुख डॉ.व्यंकट मैलापूरे, श्री सत्य साई ब्लड सेंटरचे मेडिकल डायरेक्टर महेंद्रसिंग चौहान, थॅलेसेमिया सोसायटीचे सचिव अनिल दिवेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली.

 

या शिबिरामध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवत, एकूण 102 कामगार, कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून रुग्णांचे प्राण वाचवण्याकरिता अमूल्य योगदान दिले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सर्व रक्तदात्याला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी इप्का लॅबोरेटरीजचे एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, संतोष कोटकर, राजू सावळे, नीरज गायकवाड, गिरीधर गायकवाड, देवदत्त कुलकर्णी, कमलेश जैन, अमर बोराटे, संतोष देशमुख आदींनी सहकार्य केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *