March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.22)- बजाजनगर येथील त्रिमूर्ती बालक मंदिर व त्रिमूर्ती हायस्कूल या शाळेच्या वतीने प्रभु श्रीरामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शाळेच्या वतीने बजाजनगर येथे शनिवारी (ता.20) रोजी भव्य शोभायात्रा मोठ्या जल्लोषात काढण्यात आली.


कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून त्रिमूर्ती शिक्षण संस्थेचे सचिव विजयसिंग ठाकूर, अध्यक्ष भागचंद भाट, उपाध्यक्ष भिमसिंग शिरे, संचालिका अर्चना ठाकूर, सदस्य रेखा मेवाल, संचालक व्यंकटेश ठाकूर, शाळेचे मुख्याध्पक प्रदीप आमले व मुख्यध्यापिका रंजना घोडके आदींची उपस्थिती होती.

या शोभा यात्रेत प्रभू श्रीरामाची पालखी व राम, लक्ष्मण, सीता व रामभक्त हनुमान यांच्या यांच्या वेशात विद्यार्थी होते. या प्रसंगी त्रिमूर्ती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्याने उपस्थित होते. परिसरातील रामभक्त या मिरवणुकीत मोठ्या उत्साने सहभागी होऊन आनंद घेतला. यावेळी संपूर्ण परिसर राममय झाला होता.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *