March 24, 2026

वाळुज महानगर, (ता.16) – रक्तबंबाळ झालेला व अर्ध नग्न अवस्थेत असलेला एक परप्रांतीय कामगार बजाजनगर येथील मुख्य बाजारपेठेत विव्हळत पोलीस व रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत असतानाचा व्हिडिओ सोमवारी 16 जुन रोजी दुपारी व्हायरल झाल्याने वाळूज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, बजाजनगर येथील मीनाताई ठाकरे मार्केटमध्ये किरकोळ वादातून राकेश यादव वय 29 या परप्रांतीय कामगाराला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी जबर मारहाण केली. सोमवारी 16 जुन रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना पहावयास मिळाली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. विशेष म्हणजे रक्तबंबाळ व अर्ध नग्न अवस्थेत तो बराच वेळ पोलीस व रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत विव्हळत होता. हा जखमी कामगार एका खाजगी कंपनीचा असून तो परप्रांतीय आहे. मात्र या कामगाराला कोणी व कशामुळे मारहाण केली. याबाबत माहिती मिळू शकली नाही. दरम्यान या जखमी कामगाराला उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्याच्यावर घाटी दवाखान्यात उपचार घेत आहेत. मात्र भर दुपारी घडलेल्या या घटनेमुळे कामगार व उद्योग क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *