February 5, 2026

वाळूज महानगर – पी एम श्री प्रशाला तुर्काबाद (खराडी) येथे राष्ट्रीय धर्माचार्य ह भ प जनार्दन मेटे महाराज यांच्या वतीने शाळेतील गरीब, होतकरू व गरजू 40 विद्यार्थ्यांना शुक्रवारी 10 ऑक्टोंबर रोजी मोफत पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.

याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम गायकवाड,
विज्ञान शिक्षक अमरसिंह चंदेल, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन नाडे तसेच सह शिक्षकांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रशालेतील विविध स्पर्धेमध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांचा ह भ प धर्माचार्य जनार्दन मेटे महाराज यांनी सपत्नीक बक्षीस देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच लोकसंख्या शिक्षण अंतर्गत नृत्य स्पर्धेत प्रशालाच्या विद्यार्थिनींनी शिक्षिका निवेदिता ठाकूर व शिल्पा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला. त्याबाबतही सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे महाराज यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेमध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थिनी प्रसन्ना सोपान वाघचौरे हिने प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल तिचेही यावेळी स्वागत करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून आर्थिक हातभार लावल्यामुळे शाळेतील सर्व शिक्षकांचे मेटे महाराज यांनी विशेष कौतुक केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *