
वाळूज महानगर – बंद असलेल्या घरातून सोन्या-चांदीच्या दागिन्यासह चांदीचे शिक्के, चांदीचे भांडे असा जवळजवळ 40 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. 18 अगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान झालेल्या या चोरी प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध 7 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तुर्काबाद येथील मेन रोडवर जैन मंदिरासमोरील राहते घर बंद असताना घराच्या दरवाजाची कडी तोडुन अज्ञात आरोपींनी घरातील कपाटातुन 5 हजार रुपये किंमतीची 2.5 ग्रॅम वजनाची सोन्याची एक आंगठी, 8 हजार रुपये किंमतीची 4 ग्रॅम वजनाची एक सोन्याची आंगठी, 1 हजार रुपये किंमतीचा एक सोन्याचा लक्ष्मी देवीचा शिक्का, 12 हजार रुपये किंमतीच्या एकुण 6 ग्रॅम वजनाच्या मंगळसुत्रातील 2 सोन्याच्या वाटया, 2 हजार रुपये किंमतीची 2 ग्रॅम वजनाची नाकातील सोन्याची नथ, 5 हजार रुपये किंमतीची 97 ग्रॅम वजनाची एक चांदीची लक्ष्मीची मुर्ती, 1 हजार रुपये किंमतीची चांदीची 10 नाणी, 500 रुपये किंमतीचा लक्ष्मीचा चांदीचा शिक्का, 500 रुपये किंमतीचा चांदीचा गणपतीचा शिक्का, 500 रुपये किंमतीचा बालाजीचा चांदीचा शिक्का, 500 रुपये किंमतीचा कुबेरचा चांदीचा शिक्का, 1 हजार रुपये किंमतीची एक नग चांदीची ताटली, 1 हजार रुपये किंमतीची एक नग चांदीची वाटी, 1 हजार रुपये किंमतीची एक चांदीचे कवर असलेली रुद्राक्षाची माळ असा जवळजवळ एकूण 39 हजार रुपये किमतीचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. ही चोरी 18 अगस्ट 2025 ते 3 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान झाली. याप्रकरणी पंकज बिरजलाल मिनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय शितोळे करीत आहे.
