March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.10) – कंपनी बंद करून सर्वजण घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्याने शटर उचकटून कार्बाईड टुल्स, कार्बाईड एन्ड मिल, कार्बाईड ड्रील कार्बाईड गन ड्रील, केनटीप, कार्बाईड इनसर्ट, सेंट्रल ड्रील, हॅन्ड टुल्स व इतर कंपनीचे टुल्स असा 30 लाख 16 हजार 515 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. वाळुज औद्योगिक वसाहतीत बुधवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या या चोरीतील आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात आले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्राईड इनिग्मा अपार्टमेंट, सुतगिरणी चौक ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथील अमित महादेवराव कोरडे यांची पत्नीच्या नावाने वाळूज औद्योगिक वसाहतीतील सेक्टर एक्स 280 मधील ओसवाल कॉम्पेक्स येथे राजदेव अण्ड को. या नावाची इंडस्ट्रीयल कटिंग टुल्स ट्रेडिंग कंपनी आहे. या कंपनीत इंडस्ट्रीयल टुल्स बाहेरील कंपनीकडुन मागवुन ती वाळुज परिसरातील कंपन्यांना विक्री केल्या जाते. कंपनीत तीन कामगार आहेत. बुधवारी (ता.6) रोजी रात्री सर्वजण घरी गेल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी कंपनीचे शटर उचकटून कंपनीतील कार्बाईड टुल्स, कार्बाईड एन्ड मिल, कार्बाईड ड्रील, कार्बाईड़ गन ड्रील, केनटीप, कार्बाईड इनसर्ट, सेंट्रल ड्रील, हॅन्ड टुल्स व इतर कंपनीचे मागवलेले टुल्स असे व इतर 474 प्रकारचे कंपनीतील इंडस्ट्रीयल टुल्स असे एकुण 30 लाख 16 हजार 515 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. 7 मार्च रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही चोरीची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अमित महादेवराव कोरडे (43) यांच्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरटे सीसीटीव्हीत –
ही चोरीची घटना उघडकीस येतात कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 6 मार्च रोजी रात्री 7 ते 7 मार्च रोजी सकाळी 5 वाजे दरम्यान अज्ञात चोरट्याने कंपनीचे शटर उचकटवुन व वाकवुन कंपनीतील रॅकमधील ठेवलेले व कंपनीत ठेवलेला ऐवज चोरी करतानाचे सीसीटीव्हीत आले आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *