February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.24) – काहीएक काम नसताना कंपनीच्या गेटवरून आत प्रवेश करून सुपरवायझरच्या डोक्यात फावडे मारून खून करून तीन वर्षांपूर्वी कंपनीतून फरार झालेल्या एका आरोपीलला वाळूज एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता.23) रोजी फुलंब्री येथून जेरबंद केले.


वाळूज औद्योगिक वसाहतीतील श्री इंजिनियरिंग कंपनीत 24 फेब्रुवारी 2019 रोजी सेकंड शिफ्टमध्ये जगदीश प्रल्हाद भराड, सुपरवायझर गोपाल विक्रम काळे, मुकेश साळुंके, (सुपरवायझर) आणि कामगार विष्णु ढोके, सुरेश ईधाटे असे चौघेजण काम करत होते. दरम्यान रात्री साडे अकराच्या सुमारास कामगार सोमेश सुधाकर ईधाटे हा काही काम नसताना गेटवरून कंपनीमध्ये आला. त्यामुळे सुपरवायझर मुकेश सांळुके हे सोमेश ईधाटेला म्हणाले की, तुझे येथे काय काम, तु कशासाठी आला. त्यानंतर सोमेश याने काही एक प्रतिक्रिया न देता थोडा वेळ शांत बसुन राहीला व कंपनीच्या गेट जवळ गेला. त्यानंतर थोड्याच वेळात कंपनीचा कामगार मोहन आवचर व ईधाटे यांच्यात वाद झाला. यावेळी मोहन आवचार याने प्लास्टीकटची नळी सोमेश ईघाटेच्या पाठीत मारली. त्यामुळे सोमेशला त्याचा राग आला. त्यानंतर त्याने जवळ पडलेले लोखंडी दांडा असलेले फावडे मोहनवर मारणेसाठी उगारले. मात्र मोहन आवचार तेथुन कंपनीत पळाला. त्याच वेळी सोमेश ईधाटे याने तेथे उभा असलेला जगदीश भराड यांच्या डोक्यात लोखंडी फावड्याने मारले. त्यामुळे जगदीश भराड जागीच खाली पडले. त्यानंतर सोमेश ईधाटे याने जगदीश भराड खाली पडला. त्यायानंतरही त्यांच्या डोक्यावर व तोंडावर फावड्याने मारुन ठार केले. जगदीश भराड याच्या डोक्यात व चेह-यावर गंभीर मार लागल्यामुळे तो रक्ताचे थारोळ्यात पडला. त्यानंतर सोमेश ईघाटे तेथून पळुन गेला. याप्रकरणी गोपाल विक्रम काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तो पश्चिम बंगाल व ओरिसा येथे काम करून आपले अस्तित्व लपवत होता. तीन वर्षांपासून पसार असलेला सोमेश ईधाटे गावी येणार असल्याची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शना खाली उपनिरीक्षक संदीप शिंदे अंमलदार राहूल बंगाळे यांनी सोमेश ईधाटे याला फुलंब्री तालुक्यातील शिरोडी येथून सोमवारी (ता.23) रोजी अटक केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *