February 22, 2025

वाळूज महानगर – नदीच्या पाण्यात कपडे धुत असताना अचानक तिसगावच्या नदीला पूर आला आणि त्यात महिला व मुली अशा तीन जणी वाहू लागल्या. मात्र सतर्क नागरिकांच्या नागरिकांमुळे दोन जणींना वाचवण्यात यश आले. मात्र एक पाण्यात वाहून गेली. ती बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे. ही घटना रविवारी (ता.11) सप्टेंबर रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास घडली.

वाळूज परिसरातील तिसगाव येथून देवगिरी नदी वाहते. देवगिरी किल्ल्यापासून येणारी ही नदी तिसगाव, सिडको वाळूज महानगर ते पंढरपूर जवळ खाम नदीला मिळते. या नदीच्या पात्रात ए एस क्लब जवळ राहणाऱ्या राजस्थानी महिला व मुली अशा तीन जणी कपडे धूत होत्या. रविवारी (ता.11) रोजी दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे या नदीला मोठा पूर आला. त्यामुळे कपडे धुणाऱ्या तिघीजणी पाण्यात अडकल्या. त्यांनी एका झाडाचा सहारा घेत आरडाओरड केल्याने काही दक्ष नागरिकांची नजर त्यांच्याकडे गेली. लगेच त्यांनी धाव घेत वाहून जाणाऱ्या महिला व मुलींना पकडले. मात्र एक मुलगी वाहून गेली. दरम्यान वाळूज अग्निशमन दलाचे पी के चौधरी, सी आर पाटील, एस जी महाले, वाय डी काळे यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या पुरात वाहून जाणाऱ्या महिलेचे नाव हिरुबाई रघु जोगराणा (वय 50) व मुलीचे नाव नीतू कालू जोगराणा (वय 17) असे आहे. या दोघींना वाचवण्यात नागरिकांना यश आले. मात्र मुलगी या पोराच्या पाण्यात वाहून गेली. तीचे नाव राधा नागरी सापडा (वय 14) असे असून तीचा शोध सुरू आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *