
वाळूजमहानगर, (ता.4) – बजाजनगर येथील नाना नानी पार्कच्या पाठीमागील बाजूचे ड्रेजनलाईन चोकअप झाले. त्यामुळे रस्त्यावर पाणी होऊन परिसरात दुर्गंधी पसरली आहे. मात्र याकडे एमआयडीसीचे सोयस्कर रित्या दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. परिणामी येथील नागरिक कामगार व विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

बजाजनगर या कामगार वसाहतीत सोयी, सुविधा पुरविण्याचे काम एमआयडीसीच्या माध्यमातून केल्या जाते. यामध्ये कचरा उचलणे, स्वच्छता राखणे, पिण्याचे पाणी पुरवणे, स्ट्रीट लाईट, मुख्य व अंतर्गत रस्ते, मुख्य रोडवरील वाहतूक सिग्नल व्यवस्था, ड्रेनेज लाईन. आदींचा प्रमुख्याने समावेश आहे. मात्र या सोयी, सुविधा देण्यास एमआयडीसीकडून चाल ढकल होत असल्याचे दिसून येते. त्याचाच परिणाम म्हणून सर्वत्र साचलेला केरकचरा, चोकअप झालेली ड्रेनेज लाईन, पिण्याचे शुद्ध पाणी. असे प्रश्न अद्यापही सुटलेले नाही. विशेष म्हणजे ग्रामपंचायतीचा एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश नसल्याने येथील नागरी समस्या गेल्या अनेक वर्षापासून अद्यापही कायम स्वरूपी सुटलेल्या नाहीत. फक्त निवडणुका आल्या की, येथील नेते मंडळी व स्थानिक पदाधिकारी मतदान मागण्यासाठी येतात आणि आश्वासने देतात. मात्र समस्या सोडवून घेण्यासाठी पुढाकार घेतल्या जात नसल्याचे चित्र दिसून येते. बजाजनगर येथील नाना नानी पार्कच्या पाठी मागील बाजूला गेल्या अनेक दिवसापासून ड्रेनेज लाईन चोकअप झाली आहे. या ट्रेनचे दुर्गंधीयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात साचले असून ते आता रस्त्यावर ओसंडून वाहत आहे. परिणामी परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे.
येथील महाराणा प्रताप चौक, हायटेक कॉ
लेज, आम्रपाली बुद्ध विहार, नांद्रे आबा चौक. हा अत्यंत गजबजलेला परिसर आहे. या परिसरात शाळा, कॉलेजसह अनेक खाजगी शिकवणी वर्ग चालतात. त्यामुळे येथे दिवसभर विद्यार्थ्यांसह कामगार व नागरिकांची वर्दळ असते. या दुर्गंधीयुक्त पाण्याच्या त्रासामुळे येथील विद्यार्थी, कामगार व नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एमआयडीसी ने तात्काळ याकडे लक्ष देऊन ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करावी अशी मागणी
बजाजनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्राम पारे, काँग्रेस उद्योगसेल विभागाचे जिल्हाध्यक्ष अर्जुन आदमाने पाटील, लक्ष्मण लांडे पाटील, नवनाथ मनाळ आदींनी केली आहे. दरम्यान याबाबत एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता गणेश मुळीकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी की, जर कोठे ड्रेनेज लाईन लिक झाली असेल किंवा फुटली असेल. तर ती तात्काळ दुरुस्त करण्यात येईल.
