
वाळूजमहानगर, (ता.24) – वाळूज औद्योगिक वसाहतीतील इप्का लॅबोरेटरीज या कंपनीचे मानव संसाधन अधिकारी डॉ. व्यंकट मैलापूरे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कामगिरीची संजीवनी फाऊंडेशन (महाराष्ट्र राज्य) ने दखल घेऊन मैलापूरे यांना 2023 चा ‘शिवछत्रपती गुणिजन गौरव’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सानप यांनी दिलेले या निवडबद्दलचे पत्र मैलापूरे यांना नुकतेच प्राप्त झाले आहे. हा पुरस्कार 3 जून 2023 रोजी श्रीमंत छत्रपती संभाजीराजे भोसले, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आ. रोहित पवार, आ. सत्यजित तांबे, आ. ऋतुराज पाटील. ना. नरहरी झिरवळ, ना. नीलम गोऱ्हे आदी मान्यवरांच्या उपस्थित सिन्नर, नाशिक येथे वितरित होणार आहे. या निवडीबद्दल डॉ. मैलापूरे यांचे विविध स्तरातून स्वागत होत आहे.
