March 26, 2026


वाळूजमहानगर (ता.6) – बजाजनगर येथील श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीचे रसायनशास्त्र विभागाचे डॉ. मनोज डमाळे यांना डॉ. बाटु विद्यापीठातर्फे कर्करोगावरील संशोधनासाठी 3.15 लाख रुपयांचे अनुदान जाहीर झाले. या यशामुळे डमाळे यांचे भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेसह सर्वच स्थरातून स्वागत होत आहे.

पोटाच्या कर्करोगास कारणीभूत असलेल्या बॅक्टरीयावरील औषध शोधण्याचे काम ते या संशोधनात करणार आहेत. डॉ. मनोज डमाळे हे राष्ट्रीय औषधनिर्माण संस्था, कोलकताचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांच्या या यशाबद्दल भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्थेचे सचिव एकनाथ जाधव, सहसाचीव अमन जाधव, श्रीनाथ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. संतोष शेळके, प्रशासकीय अधिकारी बी. बी. जाधव तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी डॉ. डमाळे यांचे स्वागत केले. या संशोधनातून सर्वसामान्य रुग्णांसाठी कर्करोगावरील उपचाराचा चांगला पर्याय निर्माण होईल. अशी खात्री डॉ. डमाळे यांनी व्यक्त केली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *