March 23, 2026

वाळूज महानगर, (ता.11) – मेस्टाचे राज्यस्तरीय अधिवेशन डॅा. काशिनाथ घानेकर सभागृहा ठाणे पश्चिम मुंबई येथे सोमवारी (ता.21) रोजी घेण्यात येत आहे.


या अधिवेशनास मेस्टाच्या सर्व विभाग, जिल्हा आणि तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागातील शाळांना भेटी देऊन त्याच्या समस्या जाणून घ्याव्या. संस्थाचालक, शिक्षक यांना भेटून त्यांना अधिवेशन बाबत माहिती द्यावी आणि जास्तीत जास्त संख्येने ठाणे येथे अधिवेशनाला उपस्थित राहण्याबाबत तयारी करावी, संस्थाचालक, शिक्षक यांच्या काही समस्या किंवा काही प्रश्न असेल तर ते कळविण्यात यावे. जेणेकरून अधिवेशनात प्रश्न सोडविण्यात येईल.
अधिवेशनाची अंदाजे रूपरेषा :-
उद्घाटक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री
एकनाथराव शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे,
कार्यक्रम अध्यक्ष – मेस्टाचे संस्थापक अध्यक्ष डॅा. संजयराव तायडेपाटील, प्रमुख उपस्थिती – शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार सचिन आहीर, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भा.ज.पा.प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे, मेस्टाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॅा. नामदेव दळवी, प्रदेश संघटक अनिल असलकर, प्रदेश कार्याध्यक्ष प्रा.विजय पवार, कोषाध्यक्ष मनिष हांडे, सर्व महाराष्ट्र राज्य, जिल्हा, तालुका पदाधिकारी, समन्वयक:- ठाणे जिल्हा मेस्टा कार्यकारिणी उपस्थित राहणार आहे. यावेळी मन्यवरांच्या हस्ते बेस्ट टिचर्स , बेस्ट ट्रस्टी, बेस्ट प्रिंसिपल, बेस्ट स्कुल, शिक्षण मित्र पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती मेस्टाचे महासचिव डॉ. विनोद कुलकर्णी यांनी दिली.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *