March 27, 2026


वाळुज महानगर, (ता.26) – भरधाव जाणारी दुचाकी आणि आयशर ट्रक यांच्यात जोराची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील दोन जण जखमी झाले. जखमीतील एक जण गंभीर आहे. हा अपघात छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरील ईसारवाडी फाटा येथे शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी दुपारी झाला.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमोल उत्तमराव वाबळे (वय 39) आणि अतुल उत्तमराव वाबळे (वय 31) रा. बोल्हेगाव ता. गंगापूर हे दोघे सख्खे भाऊ दुचाकी (एम एच 20, एफ एल -8570) ने छत्रपती संभाजीनगरवरून बोल्हेगावला जात होते. त्यांची दुचाकी छत्रपती संभाजीनगर ते पुणे हायवेवरील ईसारवाडी फाटा येथे येताच अज्ञात आयशर ट्रक अचानक आडवा आला. त्यामुळे त्यांच्यात जोराची धडक होऊन दुचाकीवरील दोघेही जखमी झाले. जखमी पैकी अमोल वाबळे यांच्या पायाला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला.

शुक्रवारी 26 सप्टेंबर रोजी दुपारी 3:15 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी नाणिजधाम रुग्णवाहिकेचे चालक संदीप त्रिंबके यांनी जखमीला छत्रपती संभाजीनगर येथील सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्ये दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *