March 23, 2026

वाळूजमहानगर, (ता.5) – बजाजनगर येथील विविध परिसरात टुकार मुलांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे महिला, मुली व विद्यार्थिनींच्या छेडछाडीसह अनेक अनुचित प्रकार वाढले आहे. या टुकार मुलांचा बंदोबस्त करण्यात यावा. या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने पोलीस ठाण्यात धाव रविवारी (ता.5) रोजी घेत निवेदन देण्यात आले आहे.

या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, बजाजनगर येथील आर एल ग्रुप परिसरात अनेक शैक्षणिक संस्था आहे. शिवाय विविध क्लासेस सुद्धा आहेत. त्यामुळे नेहमी येथे विद्यार्थ्यांसह विद्यार्थीनी, महिला व मुली यांचा वावर असतो. मात्र या परिसरात टुकार मुलांचाही सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे महिला मुलींची छेडछाड होत आहे. शिवाय मारामाऱ्या व अर्वाचे भाषेत शिवीगाळ ही नेहमी होताना दिसते. ही टुकार मुले कर्णकर्कश हॉर्न वाजवत दुचाकी सुसाट पळवतात. त्यामुळे अपघातही होतात. नेहमी घडणाऱ्या या घटनांमुळे महिला मुली व विद्यार्थिनी त्रस्त झाले असून त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा. या मागणीसाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने मीराताई पाटील, संगीता बनकर, ग्रामपंचायत सदस्य मंदाताई भोकरे, कमलताई गरड, शोभाताई सरकटे, मीरा चव्हाण, अनिता लेंडे, वैशाली जीवरग आदींच्या वतीने हे निवेदन देण्यात आले. वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मदनसिंग घुनावत यांनी हे निवेदन स्वीकारून कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *