March 23, 2026

वाळूज महानगर (ता.16) : – कोहळा घेऊन पुण्याकडून औरंगाबादकडे भरधाव येणारी महिंद्रा पिकअप टायर फुटल्याने उलटून दोन जण जखमी झाले. हा अपघात नगर औरंगाबाद रोडवरील जिकठाण फाट्याजवळ गुरुवारी (ता.16) रोजी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास झाला. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अंबुलन्सने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या अपघाताबाबत मिळालेली माहिती अशी की,
पुण्यावरून पीकअप महेंद्रा (एम एच 21, बीएच-4386) कोहळा भरून औरंगाबादला येत असताना जिकठाण फाट्याजवळ येताच राइट साईडचे मागचे टायर फुटल्याने अपघात झाला. या मध्ये महिंद्रा पिकअप मालक अमोल राठोड वय 22 वर्ष, रा. मालतोंडी गाव जि. जालना व कोहळा चे मालक नितीन कानडे वय 32 वर्ष रा. पुंडलिकनगर, औरंगाबाद हे जखमी झाले. त्यांना या अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अंबुलन्सचा पायलट संदीप त्रिंबके यांनी ईतर प्रवाशांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *