वाळुज महानगर, (ता.17) – रांजणगाव व जोगेश्वरी परिसरातील सर्वच रहिवासी भागातील विजेच्या पुरवठ्यातील समस्येने त्रस्त झालेल्या वीज ग्राहकांनी, तरुणांनी व शिवसैनिकांनी जोगेश्वरी येथील महावितरण कार्यालय टाळे लावून 17 जून रोजी निषेध व्यक्त केला. दरम्यान सहायक अभियंत्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर व जॅक्सन कंपनीच्या प्रतिनिधीशी सर्वांसमक्ष फोनवर बोलणं करून प्रलंबित काम तात्काळ पूर्ण होईल. असा शब्द घेतल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
वाळूज औद्योगिक परिसरातील जोगेश्वरी, रांजणगाव (शेणपुंजी) तसेच परिसरातील सुंदर कॉलनी, आंबेडकरनगर, कमळापूर, ओमसाई नगर, रांजणगाव या भागामध्ये विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. अवेळी वीज खंडित होणे, दिवस-दिवस वीज पुरवठा खंडित राहणं या समस्यांबाबत अनेक निवेदन दिल्यानंतरही अपेक्षित कारवाई न झाल्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी व जोगेश्वरीतील तरुण मित्रपरिवार यांनी अखेरचा पर्याय म्हणून महावितरण कार्यालयास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी 17 जून रोजी टाळे लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
या प्रसंगी येणाऱ्या 20 दिवसात विजेची समस्या दूर करण्यात येईल असे लेखी आश्वासन महावितरणचे सहाय्यक अभियंता डी बी काळे यांच्याकडून घेतले.

यावेळी जोगेश्वरीचे माजी सरपंच प्रविण दुबिले, उद्योजक सरपंच अमोल लोहकरे, रामदास गुळे, माजी सरपंच गजानन बोंबले, कैलास शेवाळे, साईनाथ दुबिले, काकासाहेब दुबिले, बबन भाग्यवंत, राजू काजळे, बंडू काजळे, लक्ष्मण दुबिले, ईश्वर वाकचौरे, लक्ष्मण साध्ये, किरण गुळे, एकनाथ ठोंबरे, बाबासाहेब दुबिले, राजू दुबिले, प्रवीण थोरात, लखन भारसाकले, इस्माईल शेख, विठ्ठल जगताप, अरुण दुबिले, ज्ञानेश्वर दुबिले, अशोक दुबिले, निलेश शिंदे, राजेश सोनवणे, विशाल सुरडकर, दीपक दुबिले, पप्पू निकम, गणेश साळुंखे यांच्यासह नागरिक व शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
