March 29, 2026

वाळूजमहानगर, (ता.02) – पगाराचे पैसे देण्याचे कारणावरून लाकडी दांड्याने व चाकूने मानेवर, पोटावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना जोगेश्वरी येथे 1 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच जणां विरुद्ध सोमवारी (ता.2) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती आशी की, जोगेश्वरी येथील विशाल पवार व त्याचा भाऊ सागर हे पेंटिंग ठेकेदार कृष्णा मगरे रा. जोगेश्वरी याच्याकडे काम करतात. शनिवारी (ता.1) रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास विशाल सदाशिव पवार, (वय 27 वर्ष), रा. जोगेशोरी व त्याचा भाऊ जोगेश्वरी येथील तथागत चौकात उभे असताना तेथे आरोपी कृष्णा मगरे, अनिल एडके, करण चौथमल, आकाश शेरे, सुंदर चौथमाल सर्व रा.जोगेश्वरी आले व विशाल पवार तसेच त्याच्या भावाला शिवीगाळ करून पगाराचे पैसे देण्याचे कारणावरून वाद झाला. यावेळी विशाल पवार व त्याच्या भावाला लाकडी दांड्याने व चाकूने मानेवर, व पोटावर वार करत गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यातील दोन्हीही जखमीवर गाठीत उपचार सुरू आहे. याप्रकरणी विशाल सदाशिव पवार यांच्या फिर्यादीवरून वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन पागोटे हे करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *