March 23, 2026

वाळुज महानगर, (ता.17)- वाळूज परिसरातील जोगेश्वरी येथे भाजपाच्या वतीने गाव चलो अभियान राबवण्यात येऊन विविध योजनांची माहिती शनिवारी (ता.17) रोजी देण्यात आली.


जोगेश्वरी येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित गाव चलो अभियानांतर्गत आमदार प्रशांत बंब यांच्या मार्गदर्शनाखाली महिला बचत गटाच्या भेटी घेण्यात आल्या. यावेळी महिला बचत गटात विविध शासकीय केंद्र व राज्य सरकारच्या योजनेची माहिती देण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने वैयक्तिक लाभाच्या योजना व खेळते भांडवल मिळवून देणे तसेच विविध व्यवसायासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, नव मतदार नोंदणी, आयुष्यमान भारत कार्ड योजना, गरीब कुटुंब कल्याण योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, संजय गांधी व श्रावण बाळ निराधार योजना, इमारत बांधकाम कामगार योजना, उज्वला गॅस योजना. आदी योजनेची माहिती देण्यात आली.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य दीपक बडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश हिवाळे, पंकज हिवाळे, बेबी शेळके, वंदना शिरसाट, रोशनी चौतमल, आशा दांडगे, रत्ना निकम, जयश्री तुपे, पुनम जिने, शुबानी शेख, मीरा पठारे, रेखा चव्हाण या महिला उपस्थित होत्या.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *