
वाळूजमहानगर (ता.11) – आयएसओ मानांकन ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरी तर्फे रामराई, रामराई वाडी, कमळापूर, नायगाव, बकवाननगर व जोगेश्वरी येथील 230 जणांना अपंग निधीच्या धनादेशाचे वाटप शुक्रवारी (ता.10) रोजी करण्यात आले.
यावेळी सरपंच योगिताताई रामेश्वर आरगडे, उपसरपंच नजीर खान पठाण, उद्योजक अमोल लोहकरे, रमेश आरगडे, ग्रामविकास अधिकारी रमेश मुळे, ग्रामपंचायत सदस्य प्रवीण दुबिले, योगेश दळवी, गणेश साबळे, किशोर बिलवाल, गजानन बोंबले, प्रभाकर काजळे, पंडित पनाड, कृष्णा काजळे, विलास सौदागर, शेख मोइस, गणेश ठोकळ, सुरेश नाना वाघमारे, प्रवीण थोरात, अनिल वाघ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. यावेळी लाभार्थ्यांसह ग्रामस्थाची प्रमुख उपस्थिती होती.
निधीचा योग्य उपयोग करा –
जोगेश्वरी ग्रामपंचायतकडून दरवर्षी अपंगांना निधी वाटप केला जातो. जोगेश्वरी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाच गावात सन 2023 मध्ये 230 अपंग लोकांची नोंदणी केली. त्यानुसार सर्वांना लाभ मिळावा यासाठी प्रत्येकी 5 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. यावेळी या निधीचा उपयोग करून व्यवसाय सुरू करा जेणे करून भविष्यात तुम्हाला आर्थिक स्रोत उपलब्ध होईल. असे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत जोगेश्वरीच्या वतीने करण्यात आले आहे.
