
वाळूज महानगर, (ता.23) – अंदर बाहर नावाचा जुगार खेळणाऱ्यांवर वाळुज एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले. आरोपीकडून जुगाराच्या साहित्यासह 41 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई शुक्रवारी (ता.22) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथे करण्यात आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, रांजणगाव (शेणपुंजी) येथील कमळापूर फाटा वाळुच्या ठेक्याजवळ पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळला जात असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी (ता.22) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास छापा टाकला असता त्या ठिकाणी आरोपी सत्यम शंकर जाधव वय 21 वर्ष, रा त्रिमुर्ती कॉलनी रांजणगाव (शेणपुंजी), फारुख इस्राईल शहा वय 25 वर्ष रा. देवगिरी कॉलनी रांजनगाव (शेणपुंजी), आकाश कचरु पवार वय 24 वर्ष, रा. टी पी पार्क कमळापूर, सुनिल रामेश्वर जाधव वय 23 वर्ष, रा. देवगीरी कॉलनी रांजणगाव (शेणपुंजी), लक्ष्मीकांत साहेबराव बोबडे वय 31 वर्ष, रा. देवगीरी कॉलनी रांजणगाव (शेणपुंजी) व देवानंद अशोक खिल्लारे वय 25 वर्ष, रा. दत्तनगर, रांजनगाव (शेणपुंजी) ता. गंगापूर हे पत्त्यावर पैसे लावून जुगार खेळताना मिळून आले त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जुगाराच्या साहित्यासह 41 हजार 900 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव, पोनि.गणेश ताठे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि. गौतम वावळे, पोउपनि दिपक रोठे, धीरज काबलिये, यशवंत गोबाडे, नितीन इनामे, सुरेश कचे, सुरज अग्रवाल यांनी केले. याप्रकरणी पोलीस अंमलदार सुरजकुमार जीवन अग्रवाल फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध कलम 12 (अ) म. जु. का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार कारभारी गायकवाड करीत आहे.
