वाळूजमहानगर – बजाजनगर येथील सारा वृंदावन येथील सोसायटी मध्ये जि. प. सदस्या ज्योति अनिल चोरडिया यांच्या स्थानिक विकास निधीतुन 15 व्या वित्त आयोगातून सन 2021 -2022 मध्ये मंजूर झालेल्या रस्ता कामाचे उद्घाटन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल चोरडिया यांच्या हस्ते करण्यात आले.
या कामास 5 लाख 15 हजार 402 रुपये निधी मंजूर आहे. यावेळी उद्घाटक अनिल चोरडिया यांनी आपल्या कार्यकाळात केलेली विकास कामे सांगितली व आपण ही नेहमीच विकास कामाना प्राधान्य देत असतो. असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ओबीसी सेलचे प्रदेश सरचिटणीस विष्णु खेडकर, जि. प. सदस्यां रेखाताई नांदूरकर, महिला आघाडी तालुका प्रमुख सुनीता अहिरे, शहर अध्यक्ष मयूर चोरडिया, माजी ग्रामपंचायत सदस्य अमित चोरडिया, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल राठी, जिल्हा उपाध्यक्ष नंदाताई राजपूत, हरिदास पल्हाळ, दादासाहेब खणसे, यमराज गिरे, हर्षद पानधोंढे, राजाराम पाटील, सुनिल मोरे, गणेश कोलते, देविदास काळे, आशिष पावडे, रवी म्हस्के, अशोक दोमाटे, चंद्रकांत सोनजे, विनोद लव्हाळे, प्रदीप पाटील, प्रकाश जाधव, आशिष धुमाळ, राजू दौंगे, बाळासाहेब पाटील, शिवाजी आव्हाड, जीवन पाटील, विठ्ठल तरटे, सुनिल जायगुडे, विजय देशपांडे, राजाराम पवार, बाबूलाल गिते, अनिल जाधव, स्वाती जाधव, रंजना धुमाळ, सुवर्णा पाटील, वर्षा पाटील, कस्तुरा जाधव, संगीता आव्हाड, मंगल परमाने, सुनिता सासणे, सविता हिरे, सुरेखा यादव, स्वाती जाधव, विद्या जाधव यांची उपस्थिती होती.