
वाळूज महानगर, (ता.3) – बजाजनगरातील श्री जागृत हनुमान मंदिर आर एक्स ग्रुप येथील निःशुल्क योग वर्गाचा द्वितीय वर्धापन दिन शुक्रवार 1 ऑगस्ट रोजी उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्त योग शिक्षक जनार्दन नवसरे, मोना राजपूत, नाना कदम, अनिल पाटील, कैलास भोकरे यांनी योग साधकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी साधकांनी अनुलोम विलोम, प्राणायाम, चक्रसन, सूर्यनमस्कार, कपाल भारती आदीचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी योग साधकांचा रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. या वर्गात दररोज पहाटे 5.30 ते 6.30 या वेळेत जवळपास 40 साधक नित्य नेमाने योग साधना करतात. वर्धापन दिन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनार्दन निकम, शिवाजी कर्डिले, संगीता कोळी, प्रमोद देशमुख, वनमाला वसूलकर, सतीश सगरे, मंगल सातपुते, मीना चौधरी, सुनीता गर्जे, सुमन सगरे यांच्यासह योग साधकांनी परिश्रम घेतले.
