
वाळुज महानगर, (ता.21) – ब्राह्गव्हाण येथून वाळुज औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाण्याची नासाडी होऊन रस्त्यावर पाणीच पाणी झाले.
दरम्यान येथून ये जा करताना अनेकांना ओलेचिंब व्हावे लागले. हे चित्र गुरुवारी (ता.21) रोजी सकाळी वाळूज ते ब्रह्मगव्हाण या रस्त्यावर पहावयास मिळाले.
