वाळुजमहानगर – वाळूज येथील दत्त कॉलनी जय माता दुर्गा नवरात्र उत्सव समितीच्या वतीने घटस्थापना करून देवी समोर रास दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात परिसरातील महिलांनी एकत्रित धार्मिक उपक्रमासह दांडीयाचा मनसोक्त आनंद घेतला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जय दुर्गामाता नवरात्र उत्सव समितीच्या अध्यक्षा मीना अभय काळे, उपाध्यक्ष प्रमिला प्रकाश पाटील, कोषाध्यक्ष सागरबाई देशमुख, सचिव मीराबाई धतुरे, सहसचिव लता गायकवाड, चंद्रकला गाडेकर. तर सदस्य अनिता गाडेकर, शैला गाडेकर, प्रमिला इंगळे, शुभदा नेवासकर, उषा धुमाळ, लता भोसले, अर्पिता जाधव, अनिता खंदारे आदींनी परिश्रम घेतले.