वाळूजमहानगर – समता कॉलनी वाळूज येथील तुळजाभवानी माता मंदिरात गेल्या बारा वर्षापासून नित्यनियमाने नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमासह रास दांडियाचे आयोजन करण्यात येते. यात महिला व मुली दंग असतात.
या मंदिराची स्थापना 20 ऑक्टोंबर 2012 रोजी त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन करून करण्यात आली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमासह हभप बाळकृष्ण केसे महाराज, हभप जनार्दन मेटे महाराज व हभप कैलास गिरी महाराज यांचे कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुळजा भवानी माता मंदिर, समता कॉलनी शिवाजीनगर वाळूज येथे नवरात्र उत्सवानिमित्त 26 सप्टेंबर रोजी घटस्थापना करण्यात आली. नऊ दिवस चालणार्या नवरात्रात परिसरातील नागरिक व महिला एकत्र येत विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. त्यात होम, हवन, महाप्रसाद याचा समावेश असतो.
तुळजा भवानी मंदिर प्रांगणात दररोज परिसरातील महिला एकत्र येत देवीची पूजाअर्चा व आरती करून रास दांडियाचा आनंद घेतात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष रामदास शिंदे, सदस्य सुनील आवटी, चंद्रकांत बोरोले, बाळासाहेब येवले, संजय चव्हाण, सुनील राठोड, चेतन बोरोले, भानुदास खांदवे, कैलास दरंदले, रामचंद्र हिवाळे, विलास जाधव, सचिन बोरुडे, सचिन निरपळ प्रयत्न करतात.