
वाळुज महानगर, (ता.4) – भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा उपाध्यक्षपदी लांझी येथील तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष जनार्दन अंबादास गांधीले पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
जनार्धन गांधीले पाटील यांच्या या नियुक्तीबद्दल वाळुज येथील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी गांधीले पाटील यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे गंगापूर तालुका उपाध्यक्ष तथा पिंपरखेडा येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन जनार्दन चनघटे, भारतीय जनता पार्टीच्या मोर्चाचे माजी तालुका अध्यक्ष बाबासाहेब शिंदे, लिटिल चॅम्प प्री प्रायमरी इंग्लिश स्कूलचे संस्थापक चेतन बोरोले, अशोक हिवाळे, श्रीराम बोचरे, रुपेश नाडे, योगेश नाडे, सुरज बत्तीस, गणेश सुरडकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
