
वाळूजमहानगर, ता.20 (बातमीदार) -वाळूज औद्योगिक वसाहतीतील रांजणगाव (शेणपुंजी) येथे जखमी अवस्थेत मिळून आलेल्या व्यक्तीस उपचारार्थ घाटीत दाखल केले असतात त्याचा उपचारादरम्यान मंगळवारी (ता.20) रोजी
मृत्यू झाला. या अनोळखी इसमाची ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाळूज औद्योगिक परिसरातील रांजणगाव (शेणपुंजी) येथे अनोळखी व्यक्ती मंगळवारी (ता.13) जून रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास जखमी अवस्थेत मिळून आला. त्यास 108 सरकारी रुग्णवाहिकेने उपचारार्थ घाटी दवाखाना येथे दाखल केले होते. मात्र उपचार चालू असताना त्या अनोळखी व्यक्तीचा मंगळवारी (ता.20) रोजी सकाळी 7 वाजता मृत्यू झाला. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू नंबर 104/2023 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
या अनोळखी व्यक्तीचे वय अंदाजे वय 50 ते 55, चेहरा लांबट, उंची अंदाजे 5 ते 5.3 फुट, शरीर सळपातळ, दाढी मिशी लागलेल्या, केस पांढरे. त्याचे वर्णन आहे.
या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास किंवा तो कोणाच्या ओळखीचा असल्यास त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रामचंद्र बिघोत करीत आहे.
