March 23, 2026


वाळूज महानगर, (ता.16) – शेतकऱ्यांनी मोठ्या काबाडकष्टाने पिकवलेला कापूस विश्वासाने खरेदी करून त्यांचे पैसे न देता विश्वासघात करून जवळजवळ 24 लाख रुपयाची रक्कम हडप करणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध रविवारी (ता.15) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी कानिफ परसराम भवर रा. शेंदुरवादा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर याने शेंदूरवादा परिसरातील एकूण ११ शेतकऱ्यांकडून कापूस घेतला. या कापसाचे एकूण रक्कम 23 लाख 81 हजार 242 रुपये शेतकऱ्यांना न देता त्यांचा विश्वासघात करून फसवणूक केली. याप्रकरणी आबासाहेब म्हसू दुबिले रा. शेंदुरवादा तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डी ओ अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल ढोले यांनी वाळुज पोलीस ठाण्यात आरोपी कानिफ परसराम भवर याच्या विरुद्ध कलम 420, 406 भा द वि. प्रमाणे रविवारी (ता.15) रोजी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप शेवाळे करीत असून आरोपी फरार आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *