
वाळुज महानगर – दारू पिऊन आलेल्या पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत लोखंडी गजाने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास कमलापूर येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सुजाता भीमराव वाकोडे (वय 30) ही विवाहिता कुटुंबासह हनुमाननगर कमळापूर येथे राहते. मंगळवारी 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजेच्या सुमारास तिचा पती भीमराव देविदास वाकोडे हा दारू पिऊन घरी आला. आणि सुजाताच्या चारित्र्यावर संशय घेत शिवीगाळ करून लोखंडी गजाने तिला मारहाण करून जखमी केले. तसेच तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
