March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.20) -चारीत्र्यावर संशय घेवुन तु कंपनीत कामाला का जाते? असे म्हणुन शिवीगाळ करुन हाताचापटाने विटेने मारून पतीने पत्नीचे डोके फोडले. वडगाव (को.) येथे 13 जानेवारी दुपारी झालेली ही घटना शुक्रवारी (ता.19) रोजी उघडकीस आली.
या बाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, निता काकासाहेब साळवे (वय 31) ही महिला सावित्रीबाई वडगाव (को.) ता. जि. छत्रपती संभाजीनगर येथे राहते. ती व तिचे पती काकासाहेब सुदाम साळवे उमासन कंपनी, वाळुज येथे सोबत काम करतात. 17 जानेवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास काकासाहेब सुदाम साळवे व जनार्धन मनोहर खरे या सासरे-जावयाचे भांडण चालु होते. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करत असताना नीताच्या चारीत्र्यावर संशय घेवुन, “तु कंपनीत कामाला का जाते” असे म्हणुन तिला शिवीगाळ व मारहाण विटाने डोके फोडले. तेव्हापासून तिच्यावर घाटीत उपचार सुरू होते. शुक्रवारी (ता .19) रोजी तिने दिलेल्या फिर्यादीवरून वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *