
वाळुज महानगर, (ता.13)- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तुझे माझे पटत नाही, आज मी तुला मारूनच टाकतो. अशी धमकी देत लाकडी दांड्याने मारहाण करून जखमी केले. ही घटना बकवालनगर येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बकवालनगर येथील सपना ज्ञानेश्वर वनारसे (42) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी ज्ञानेश्वर तुकाराम वनारसे याने सपनाच्या चरित्रावर संशय घेत तुझे आणि माझे पटत नाही, तु तुझे मनाप्रमाणे रहा. मी माझे मनाप्रमाणे राहतो. असे म्हणत शिवीगीळ करुन तुला आज मारुनच टाकतो. असे म्हणुन जिवे मारण्याची धमकी देवुन लाकडी दांड्याने मारहाण केली. या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किरण जाधवकरीत आहे.
