March 23, 2026


वाळुज महानगर, (ता.11)- आमचे लग्न का करून देत नाही, तसेच शेती वाटून देत नाही. या कारणावरून दोन भावांनी संगणमत करून 48 वर्षीय वडिलांवर चाकूने वार करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी (ता.8) रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास वाळूज परिसरात घडली. जखमीवर घाटीत उपचार सुरू आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वडगाव (को.) तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील संपत लक्ष्मण वाहुळ वय 48 हे घरी असताना त्यांच्या मुलांनी संगणमत करून आमचे लग्न का करत नाही, आम्हाला शेती का वाटून देत नाही. असे म्हणून वडील संपत वाहुळ यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन चाकुने पाठीवर, छातीवर, पोटावर व हातावर वार करून जिवे मारण्याच्या मारण्याचा प्रयत्न केला. बुधवारी (ता.8) रात्री 7:30 वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झालेल्या संपत वाहुळ यांना उपचारार्थ घाटी दवाखाना छत्रपती संभाजीनगर येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयु काँट नं. 4 येथे उपचार चालु आहे. याप्रकरणी संपत लक्ष्मण वाहून यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रकाश संपत वाहुळ वय 26, व पोपट संपत वाहुळ वय 30 यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात कलम 307, 504, 506, 34 भा. दं. वि.सह कलम 135 म.पो.का. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाथरकर करीत आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *