वाळूजमहानगर – घाणेगावातील तलावात जोगेश्वरी येथील एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. ही घटना सोमवारी (ता.10) रोजी दुपारी उघडकीस आली. मात्र त्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही.
वाळूज औद्योगिक वसाहतीतील चांदनी चौक जोगेश्वरी येथील धनराज जयसिंग मोरे (27) या तरूणाचा मृतदेह सोमवारी (ता.27) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घाणेगाव भागातील तलावात पडलेला असल्याची माहिती मिळाली यावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करून त्यास धनराजचा मृतदेह उतरणीय तपासणीसाठी पोलिस वाहनातून घाटी रुग्णालयात पाठवला. दरम्यान धनराज हा मासे पकडण्यासाठी गेला होता की, पोहण्यासाठी. हे स्पष्ट होऊ शकले नाही. या घटनेची नोंद एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.