February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.13) – घाणेगाव येथील एका कामगाराच्या 17 वर्षीय मुलाचे अज्ञात कारणासाठी अज्ञात व्यक्तीने अपहरण केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध मंगळवारी (ता.13) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

श्रयेस अशोक जाधव रा. घाणेगाव असे अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे. श्रयेस यांचे वडील अशोक जाधव हे नेहमी प्रमाणे कपंनीत असतांना त्यांना 17 सब्टेंबर रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास कवीता वानखेडे यांनी फोन करून विचारले की, तुमचा श्रयेस कुठे आहे़? तो घरी असेल. असे म्हणून जाधव घरी गेले असता श्रयेस हा बेपत्ता असल्याचे समजले. त्यामुळे त्याचा आजूबाजूला परिसरात, नातेवाईकांकडे आज पर्यंत शोध घेतला असता तो मिळून आला नाही. शिवाय त्याच्या जवळी मोबाईल बंद आहे़. त्यामुळे त्याचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी अपहरण केल्याचा संशय आल्याने अशोक जाधव यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात मंगळवारी (ता.13) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *