March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.20) – घरासमोर उभी केलेली दुचाकी शेजारीच राहणाऱ्या 30 वर्षीय तरुणाने जाळून नुकसान केले. शुक्रवारी (ता.19) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास सहजापूर येथे ही घटना जुन्या भांडणाच्या कारणावरून घडली.


याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वाळूज परिसरातील सहजापूर येथील हारुण रहिम सय्यद, (वय 43) यांच्या घराशेजारी सलीम इस्माईल सय्यद (30 वर्षे) हा राहतो. 1 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास सहजापूर येथे सलीम सय्यद याचे वडील इस्माईल कुंदन सय्यद, भाऊ इर्शाद इस्माईल सय्यद, नौशाद इस्माईल सय्यद, अलिम इस्माईल सय्यद तसेच हरून सय्यद यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाले होते. यावेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याने शबानाबी हारुण सय्यद यांनी वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. गुरुवारी रात्री 9.40 वाजेच्या सुमारास हारून सय्यद यांनी त्यांची बजाज पल्सर दुचाकी (एमएच 20, एफ एन -7270) ही हँडल लॉक करुन घरासमोर पार्किंग केली. त्यानंतर सर्वजण घरात झोपले असता शुक्रवारी (ता.19) रोजी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घरा बाहर काहीतरी फुटल्याचा मोठा आल्याने हारुण सय्यद हे कुटुंबासह उठले आणि पाहिले असता, सलीम इस्माईल सय्यद हा हातात काहीतरी स्फोटक पदार्थ घेऊन जाळीत असताना दिसला. त्याला दुचाकी जाळण्याबाबत विचारले असता तो पळुन गेला. याप्रकरणी हारूण सय्यद यांच्या फिर्यादीवरून आरोपी सलीम इस्माईल सय्यद विरुद्ध वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *