February 5, 2026

वाळूजमहानगर, (ता.2) – पती कंपनीत कामाला गेल्यानंतर लहान मुलासह घरी असलेल्या 22 वर्षीय महिलेच्या बळजबरीने घरात घुसून तिचा विनयभंग केला. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली.

मध्य प्रदेशातील 22 वर्षीय महिला पती व लहान मुलासह रांजणगाव (शेणपुंजी) येथील ओमसाई नगरात राहते. 31 डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे या महिलेचा पती कंपनीत कामाला गेला होता. तर 22 वर्षीय विवाहिता लहान मुलासह घरीच होती. रात्री नऊ वाजेच्या सुमारास पीडित महिला घरात असताना तिच्या ओळखीचा आरोपी चरणसिंग भजनलाल सैन रा. हरीओमनगर रांजणगाव (शेणपुंजी) हा बळजबरीने पीडित महिलेच्या घरात घुसला व तिच्या मनात लज्जा वाटेल असे वर्तन केले. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी चरणसिंग सैन याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *