
वाळूजमहानगर, (ता.14) – तोल गेल्याने घराच्या गॅलरीमधून पडून गंभीर जखमी झालेल्या एका 32 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी (ता.13) रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. ही घटना रांजणगाव (शेणपुंजी) येथे घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सर्जेराव मुकेश सोनवणे रा. शिवनेरी कॉलनी, रांजणगाव (शेणपुंजी) हा तरुण 10 मे रोजी रात्री अकरा वाजता तोल गेल्याने घराच्या पहिल्या मजल्याच्या गॅलरी वरून खाली पडला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास साहेब सोनवणे व कृष्णा सोनवणे यांनी उपचारार्थ घाटीत दाखल केले. उपचार सुरू असताना सर्जेराव सोनवणे याचा उपचारादरम्यान शनिवारी (ता.13) रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. या घटनेची नोंद वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
