
वाळूजमहानगर, (ता.20) – हिंदू नववर्षाच्या स्वागतार्ह समस्त हिंदू बांधवांच्या वतीने समितीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार चंद्रकांत खैरे व यावर्षीचे अध्यक्ष राजू वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली गुडीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या भव्य शुभयात्रेत सहभागी व्हावे यासाठी वाळूज महानगरात जनजागृती करण्यात आली.

छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती मंदिर ते खडकेश्वर महादेव मंदिर असा या शोभायात्रेचा मार्ग राहणार आहे. समस्त हिंदू बांधव यात मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत. त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघात वाळूज महानगर बजाजनगर परिसरातील विविध मंदिरांमध्ये शिवसेना प्रभारी शहरप्रमुख विशाल खंडागळे, उपतालुकाप्रमुख सुदाम भंडे, विभागप्रमुख संतोष चंदन यांनी गाठीभेटी घेत नागरिकांना पत्रके वाटून यात्रेत सामील होण्याचे आमंत्रण दिले तरी परीसरातील समस्त वाळूज महानगरवासीयांना यात्रेत सामील होण्याचे असे आवाहन शहर प्रमुख विशाल खंडागळे यांनी केले आहे.
