
वाळूज महानगर, (ता.9) -शस्त्रवंदी आदेशाचे उल्लं करून विना परवाना व बेकायदेशीर रित्या विक्री करण्यासाठी 25 हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा जवळ बाळगणाऱ्या एका 21 वर्षीय आरोपीस हातकड्या घालून जेरबंद केले. ही कारवाई तिसगाव झोपडपट्टीजवळ वाळुज एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी केली.
याप्रकरणी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, तिसगांव झोपडपट्टी जवळील मिटमिटा रोडवर पांढरा शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट घातलेला एक इसम गावठी कठ्ठा विक्री करिता येणार आहे. या माहितीवरून वाळूज एमआयडीसी ठाण्याच्या पथकाने दोन पंचा समक्ष सापळा रचला. आणि आरोपीस ताब्यात घेतले. अमित सुदाम लहाणे, वय 21 वर्षे, रा. मुकुंदवाडी शिवशाहीनगर ता. जि. छत्रपती संभाजीनगर असे या आरोपीचे नाव आहे. त्यांच्या अंगझडतीत एक गावटी कट्टा कमरेला लावलेला मिळुन आला. हा गावठी कट्टा (अग्निशस्त्र) बेकायदेशिररित्या चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या ताब्यात व कब्ज्यात बाळगतांना तो मिळुन आला. 25 हजार रुपये किंमतीचा हा गावठी कट्टा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिस अंमलदार लखन घुसिंगे यांच्या तक्रारीवरून आरोपी अमित लहाणे यांच्याविरुद्ध वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व शस्त्रबंदी कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी हा रेकार्डवरील गुन्हेगार असुन त्याच्या विरुध्द यापुर्वी दखलपात्र स्वरुपाचा गुन्हा दाखल आहे.
यांनी केली कामगिरी –
ही कामगिरी पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 पंकज अतुलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय सानप, वाळुज एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि. मनोज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. दिनेश बन, पोह. विलास वाघ, बाबासाहेब काकडे, बाळासाहेब आंधळे, जालींदर रंधे, राजाभाऊ कोल्हे, पोअं. विलाश पाटील, लखन घुसिंगे, शिवनारायण नागरे, संतोष बमनात, हनुमान ठोके, समाधान पाटील यांनी केली.
