March 23, 2026

वाळूजमहानगर, ता.23) – वाळुज औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधात आलेल्या एका 45 वर्षीय कामगाराने प्लॉस्टीक पाईप सारख्या दोरीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (ता.22) रोजी सकाळी उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अहिल्याबाई होळकरनगर, हदगाव जि. नांदेड येथील बालाजी संभाजी मगर हा 18 फेब्रुवारी रोजी कामाच्या शोधात वाळूज औद्योगिक वसाहतीत आला होता. त्याने एका ठेकदाराची भेट घेऊन कामाची मागणी केल्याने ठेकेदाराने त्यास रांजणगाव येथे एका खोलीत राहण्यासाठी पाठविले होते. बालाजी याने सोबत आणलेली बॅग त्या रूम ठेवून तो बाहेर गेला होता. दरम्यान, शनिवारी (ता.22) सकाळी 8 वाजेच्या सुमारास झांबड चौकातील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका झाडाला प्लॉस्टीक पाईपसारख्या दोरीने गळफास घेतल्याचे दिसले. ही माहिती दक्ष नागरीकांनी 112 ला दिली. माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला बेशुद्ध अवस्थेत घाटीत दाखल केले असता यास तपासुन डॉक्टरांनी मृत घोषीत केले. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *