
वाळुज महानगर, (ता.15) – एकीकडे अतिक्रमण हटाव मोहिमेत एमआयडीसी प्रशासन व्यस्त असताना लोकांच्या मूलभूत सुविधाकडे मात्र प्रशासनाने उघड उघड डोळे झाक केलेली दिसून येत आहे. येणाऱ्या गणेश उत्सव सणापूर्वी एमआयडीसी प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठे जन आंदोलन छेडल्या जाईल. असा इशारा शिवसेना शहरप्रमुख विशाल खंडागळे यांनी दिला आहे.

बजाजनगर मधील सगळ्यात ज्वलंत असलेला कचरा प्रश्न अजून मार्गी लागलेला नाही. त्यात अतिक्रमण हटाव मोहीम दरम्यान झालेल्या पाडापाडीचा मलबा सर्वत्र दिसून येत आहे. त्यामुळे बजाजनगर विद्रूप झालेले आहे. थोडासा पाऊस झाला तरी बजाजनगर मध्ये काही ठराविक ठिकाणी मुख्य रस्त्यावर तळे साचते. मोरे चौकाकडून मोहटा देवी मंदिर चौककडे जाताना जागृत हनुमान मंदिराजवळ भला मोठा तलाव निर्माण झाल्यासारखं भास होतो. त्यात बरीच भर म्हणून रस्त्यावर पडलेला उघडा कचरा त्या पाण्यात तरंगतो आणि सर्वसामान्य जनतेला त्या पाण्यातूनच वाट काढत जावे लागते. त्यामुळे येणाऱ्या गणेश उत्सव सणापूर्वी एमआयडीसी प्रशासनाने याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी आणि पाणी रस्त्यावर साचणार नाही याची दक्षता घ्यावी.
नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मोठे जन आंदोलन छेडल्या जाईल. असा इशारा शिवसेना शहरप्रमुख विशाल खंडागळे यांनी दिला आहे
