March 23, 2026


वाळूजमहानगर, (ता.14) – सेवेचे वृत्त हे श्री गजानन महाराजांच्या शेगावपासून सुरुवात झाले आहे, शेगाव सारखे सेवेकरी अन्य कोठेही नाही. श्री गजानन महाराजांसारखा साक्षात्कार कोणाचा नाही. मी अनेक वर्षे तेथे जात होतो. आता वाळुज येथेही श्री गजानन महाराजांचे मंदिर होते. ही मोठी चांगली गोष्ट आहे. त्यासाठी कुंजर परिवाराने जमीन दिली. त्या बद्दल त्यांना धन्यवाद देतो. सर्वांनी एकत्र या, चांगली भक्ती करा. गजानन महाराज आपल्या पाठीशी आहे. असे प्रतिपादन शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी वाळुज येथे केले.

ब्रह्मांडनायक श्री गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त कलानगर, वाळूज येथील श्री गजानन महाराज मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता सोमवारी (ता.13) रोजी झाली. या प्रसंगी महाप्रसादाचे अन्नदाते माजी खासदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे मार्गदर्शन करत होते. यावेळी गंगापूर सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक छोटू दादा कुंजर, माजी सभापती ज्ञानेश्वर बोरकर, युवा सेनेचे उपतालुका अधिकारी रमेश आरगडे, तालुकाप्रमुख दिनेश मुथा, उपतालुकाप्रमुख मनोज पिंपळे,वाळुजचे माजी सरपंच पपीन माने, विभागप्रमुख बाळासाहेब चनघटे, सुदामराव खजिनदार, सुरेश केरे, गुरुकुल शिक्षण संस्थेचे अण्णासाहेब जाधव, चक्रपाणी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीमंतराव थोरात, मुख्याध्यापक भगवान पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल भालेराव, ग्रामपंचायत सदस्य संजय शिंदे, पांडुरंग बोरकर, विश्वनाथ थोरात, कैलास पवार, अमोल धनवटे यांच्यासह पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थिती होती.      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिर समितीचे आर के भराड, गणेश जगताप, हभप सोमनाथ महाराज राऊत, योगेश चिमखडे, गौरव शिंदे, दत्तू इले, ज्ञानेश्वर आळंजकर, राजू आळंजकर, पांडुरंग राऊत, नामदेव मोरे, अनंता वाघ, रामदास वाघ, महेश पदार, नंदू क्षीरसागर, महेंद्र बोराडे,

आकाश म्हस्के, आप्पा शेवाळे व रुस्तुम शेवाळे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *