March 23, 2026

वाळुज महानगर (ता.14) – वाळुज येथील शिवसेनेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती तथा वाळुज ग्रामपंचायतचे माजी सरपंच मनोज जैस्वाल यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला धक्का देत शनिवारी (ता.14) रोजी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला.

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जैस्वाल यांचे शिवसेनेत स्वागत केले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीपसिंग राजपूत, तालुकाप्रमुख दिलीप निरफळ, विशाल खोसरे, डॉ ज्ञानेश्वर निळ, मार्केट कमिटी उपसभापती सचिन काकडे, उपतालुकाप्रमुख नंदकुमार राऊत, युवा सेना उपजिल्हाअध्यक्ष संतोष आरगडे, समन्वय सारंगधर जाधव, रामभाऊ सोनवणे, रेवननाथ शिंदे आदीसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *