February 5, 2026


वाळूजमहानगर, (ता.17) – तालुकास्तरीय खो खो स्पर्धेत रांजणगाव (पोळ) येथील लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर विद्यालयाच्या मुलीच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे या संघाची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. बजाज नगर येथील राजा शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात या स्पर्धा घेण्यात आल्या.

गंगापूर तालुका स्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन बजाजनगर येथील राजा शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयात गुरुवारी 14 डिसेंबर रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत 14 वर्षे वयोगटातील 23 मुलींच्या संघाने सहभाग घेतला होता. या संघात लोकनेते साहेबराव पाटील डोणगावकर उच्च माध्यमिक विद्यालय रांजणगाव (पोळ) च्या विद्यार्थिनींनी आपल्या सांघिक खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन करत तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. या संघाचे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघाला क्रीडा शिक्षक शिवाजी महाजन यांचे लाभले आहे. या निवडीमुळे संस्थेचे अध्यक्ष इंदुमती डोणगावकर, सचिव देवयानी डोणगावकर, मार्गदर्शक कृष्णा पाटील डोणगावकर, शालेय समिती अध्यक्ष शिवाजी पा.बोडखे, मुख्याध्यापक सुधाकर थोरात, क्रिडाशिक्षक शिवाजी महाजन, प्रशासकीय अधिकारी संतोष मल्लनाथ, कायगावचे मुख्याध्यापक आयुब शेख, विलास जाधव, अनिल कुमावत, रामेश्वर शेळके, डी.पी.चिमणकर, सी.एच. गायकवाड, ए.एन. शेख, आर. एच. शिरसाट, के.बी.मोरे, तुकाराम शेलार, प्रतिभा नितनवरे, आनंद बोडखे, ए. एस.बीरोटे, बि.जे.पांडव यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *