
वाळूजमहानगर (ता.22) – पावसाळ्यात प्रत्येक वर्षी जटिल समस्या बनलेल्या वाळुज परिसरात खाम नदीवरील पुलाचा प्रश्न अखेर सुटला असून, आमदार संजय शिरसाट यांच्या हस्ते या पूलाच्या बांधकामाचे भूमिपूजन बुधवारी (ता.22) रोजी गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आले. या पूलामुळे वळदगाव आणि पंढरपूर जोडले जाणार असून येथील नागरिकांची पुलाची समस्या कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने होत असलेल्या या पूलाच्या बांधकामासाठी अंदाजे चार कोटी रुपये खर्च येणार असून तो वर्षभरात पूर्ण होणार असल्याची माहिती उपशहर प्रमुख राजू राजपूत यांनी दिली.

याप्रसंगी माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ, नगरसेवक सिद्धांत शिरसाट, शिल्पा राणी वाडकर, जयश्रीताई घाडगे, हनुमान भोंडवे, उषाताई हांडे, रामचंद्र कसुरे, हर्षदाताई शिरसाट तसेच सरपंच अमर डांगर, उपसरपंच संजय झळके, ग्रामपंचायत सदस्य गणेश नवले, अशोक खोतकर, विष्णू झळके, वैशाली खोतकर, सीमा पहाडीये, नंदा साबळे, गंगा घुले, प्रीती शिंदे, वर्षा घोडके, ग्रामविकास अधिकारी बळीराम राठोड तसेच चंद्रभान दादा झळके, 
बाबासाहेब झळके, जनार्दन झळके, कांतराव नवले, सुभाष साबळे, नंदू खोतकर, अविनाश घुले, राजेंद्र घोडके, विनोद खोतकर, रितेश पहाडीये, रत्नाकर शिंदे, मच्छिंद्र झळके, प्रकाश मस्के, विष्णू झळके, दिगंबर साबळे, मणेश शिंदे, हिरालाल डांगर, सुरेश म्हस्के, सुनील काळे, मणिषा झळके, सुनिता मुसळे, गुंफाबाई खोतकर, रेखा पंडीत, राजेंद्र मुसळे, जालिंदर खोतकर, नितेश चुंगडे, शेख चांदपाशा, शेख शफिक,रावण साबळे, विनायक झळके, सुभाष साबळे, संजय जाधव, बाबासाहेब मुरमुरे व गावकरी उपस्थित होते.
