February 5, 2026

वाळूजमहानगर (ता.01) – वाळूज परिसरातील घाणेगाव येथील खंदारे यांच्या घराला अचानक आग लागून संपूर्ण संसार जळून खाक झाला. त्यामुळे ऐन थंडीच्या दिवसात खंदारे कुटुंब उघड्यावर आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने दखल घेत खंदारे यांना धीर देत तात्काळ 21 हजार रुपयांची आर्थिक मदत केली. शिवाय घर बांधण्यासाठी शासकीय मदत मिळवून देण्याचेही आश्वासन सोमवारी (ता.31) रोजी दिले.

घाणेगांव येथील एकलव्यनगरात गॅस सिलेंडर लिक होऊन लागलेल्या आगित खंदारे यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे खंदारे कुटुंबाला धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते संतोषभाऊ माने यांनी सोमवारी (ता.31) रोजी प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी खंदारे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना 21 हजाराची रोख मदत केली. व घर साधण्यासाठी शासकिय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी घाणेगावचे सरपंच केशवआप्पा गायके, माजी पंचायत समिती सदस्य संतोष गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य फाळके, सुभाष बनकर, नारायण बनकर, मनोज जाधव, केदार जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अजय सोनवणे, राष्ट्रवादी युवक उपतालुका अध्यक्ष मंगेश साध्ये, आंबेलोहळ सर्कल प्रमुख कृष्णा कोकणे, राहुल दुबे, उपसर्कल प्रमुख शुभम गायके, योगेश वरवटकर, नागेश चव्हाण, अजय सोनवणे, नितीन काळे, वैभव नाचन, विकास गायके, गोपाल मुंडे, गोपाल मुंढेकर, संकेत साध्ये, दिनेश बडे, रोहित जाधव, राहुल दुबे, अनिकेत सोनवणे, विजय कांबळे, विशाल अवस्थी, ज्ञानेश्वर मालकर, ज्ञानेश्वर मालकर, दीपक मोकळे व गावातील मंडळी उपस्थित होती.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *