वाळूज महानगर, (ता.28) – तीन जण आपापसात हशी मजाक करताना हसण्याचा आवाज आल्याने तेथून जाणाऱ्यानी शिवीगाळ करत हाताचापटाने व कोयत्याने मारहाण केल्याने चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (ता.26) रोजी 11.30 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील ई-कार्डचे ऑफीस समोर घडली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पवन संतोष चव्हाण, सुनिल ठाकरे, ऋषी असे गुरुवारी (ता.26) रोजी 11.30 वाजेच्या सुमारास बजाजनगर येथील ई-कार्डचे ऑफीस समोर आपापसात हासी मजाक करीत असताना रितेश दिपक तुपे, सचिन अंकुश चव्हाण हे तेथुन जात होते. हसण्याचा आवाज ऐकुन सचिन अंकुश चव्हाण याने कारे “तुला लय माज आला का?. का हसले असे म्हणून शिवीगाळ करत पवन चव्हाण, सुनिल ठाकरे, ऋषी यांना मारहान केली. तेवढ्यात स्वप्रिल, शंकर सोनवणे, राहुल चव्हाण हे तेथे आल्याने त्यांना पाहून “दहा मिनिटे थांबा तुम्हाला दाखवतो ” असे म्हणुन ते दोघे तेथुन निघुन गेले. त्यानंतर 11.40 वाजे सुमारास रितेश दिपक तुपे, सचिन अंकुश चव्हाण, करण अंकुश चव्हाण व यश सातदिवे हे तेथे आले. व कोयत्याने मारून जखमी केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपी करण अंकुश चव्हाण, रितेश दिपक तुपे, सचिन अंकुश चव्हाण, व यश सातदिवे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.