शेंदूरवादा : पर्यटनाची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरापासून औरंगाबाद नगर महामार्गावर जिकठाण फाटा येथे सृष्टी अॅग्रो टुरीझमतर्फे कोजागिरी पौर्णिमा निमित्त एक दिवस अगोदर शनिवारी ( ता. आठ )ऑक्टोबर 2022 रोजी खास कार्यक्रम आयोजन सृष्टी ऍग्रो टुरिझम तर्फे केलेले आहे.
या कार्यक्रमात सुुरेेल संगिताचा कार्यक्रम, गरबा, कौंटुंबिक खेळ,अॅन्कर, डि. जे सोबत डान्स मस्ती मिळणार असून नाममात्र शुल्कात कोजागिरी मसाला दुधासह रात्रीचे कोजागिरी चांदण्यातील सुरुची भोजन मिळणार आहे. सृष्टी ऍग्रो टुरिझम तर्फे नेहमीच विविध सण उत्सवला आधुनिकतेचे जोड देऊन साजरी करण्याचे प्रयत्न या ठिकाणी होत असून औरंगाबाद, वाळूज, शेंद्रा व इतर ठिकाणी नोकरी धंदे कामानिमित्त शहरात वास्तव्यात असलेल्या धकाधकीच्या जीवन जगणाऱ्या व्यक्तींना आपल्या ग्रामीण भागातील जनजीवन चालीरीती कळावे. यासाठी ऍग्रो टुरिझम तर्फे वेगवेगळे कार्यक्रम हाती घेण्यात येत आहे. शहरी व ग्रामीण संस्कृतिची सांगड घालण्यासाठी एक भाग म्हणून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी भव्य उत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सृष्टी ऍग्रो टुरिझम संचालिका प्रतिभा सानप यांनी सांगून जास्तीत जास्त नागरिक, ग्रामस्थ, महिलांनी आपल्या कुटुंबासह यामध्ये सहभाग घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.