February 5, 2026

वाळूजमहानगर, ता.1 (बातमीदार) – कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठाण व साकला नर्सरी अँड लँडस्केपिंग यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य वृक्षारोप कार्यक्रम राजे शहाजी महाविद्यालय अंबेलोहळ येथे मंगळवारी (ता.29) रोजी घेण्यात आला. महाविद्यालयाच्या परिसरात टीकोम, बकुळ, लिंब, कांचन, भेंडी, सिसु, शिरीष, बदाम, पिंपळ, उंबर, खैर, सप्तपर्णी, करंज अशा प्रकारची 300 झाडाची लागवड मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव बनकर पाटील, उदघाटक पद्मा तापडिया, तर प्रमुख मार्गदर्शक डॉ.सतिष सुराणा, विनोद लोहाडे, निखिल सारडा, फुलचंदजी जैन, डॉ.अनिल गंगवाल, महावीर साकला, पर्यावरण मित्र अरुण काळे, विष्णू सोमासे, विष्णू पाटील, साईनाथ जाधव यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश साकला यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले. व साकला नर्सरी अँड लँडस्केपिंग याबद्दल सविस्तरपणे माहिती सांगितली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी बनकर पाटील यांनी व्यक्तिमत्व व पर्यावरण संतुलनासाठी एक विद्यार्थी एक झाड लावण्याचा संकल्प बनकर पाटील यांनी केला. विद्यार्थ्यांनी शेतांच्या बांधावर व परस बागेत झाडे लावून जगवावे असे आवाहन केले, संस्थेच्या गोवंश गोसंवर्धन व संगोपन प्रकल्पाबाबत बोलतांना असे म्हणाले की जो गाईला जीव लावतो, तो माईला जीव लावतो’ म्हणून गाईबरोबर माईला ‌महत्त्व देण्यास सांगितले. या धावपळीच्या जगात प्रचंड वृक्षतोड झाल्याबद्दल बनकर पाटील यांनी खंत व्यक्त केली.
कार्यक्रमाचे उद्घाटक पद्मा तापडिया यांनी म्हटले की, प्रत्यकांनी झाडे लावली पाहीजे, आम्ही कन्ट्रकशन काम करतोय, मात्र घराचा नकाशा काढतांना झाडे अंगणात कशी लावता येईल. हाच उद्देश ठेवून, घरांचा नकाशा काढतो. देशीवान जतन करणाऱ्या राहीबाई पोपरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक डॉ.सतिष सुराणा यांनी गावागावात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आपल्याला झाडे लावावी लागतील, प्रत्येकांनी दरवर्षी एकतरी झाड लावावे. बनकर पाटील यांना वाचण्याचा व्यात्संग व ग्रामीण समस्याचा सखोल अभ्यास असून निरीक्षण, परीक्षण याबाबत बनकर पाटील यांचा हातखंड आहे. असे म्हणाले. उद्धव शिरसाठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ग्रामीण भागातील पेरू खाण्याच्या प्रसंगाबद्दल लहानपणीचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलान प्रकल्प व्यवस्थापक रोहिदास कुसळकर यांनी तर आभार प्रा.शारदा दाबके यानी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी
संचालक गणेश बनकर, संचालक राजेश बनकर, प्राचार्य सि.एन पवार, राजरत्न भोजने, विक्रम टोटलवार, गणेश पायगुडे यांनी परिश्रम घेतले.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *